Contact Us

Comprehensive Wellness परिपूर्ण आरोग्य

Blog

भारताची आयुर्वेद शास्त्राची परंपरा ही फार प्राचीन म्हणजे जवळपास ५००० वर्षांपूर्वीची आहे. त्या वेळचे ऋषी-मुनी हे अत्यंत बुद्धिमान व सौशोधक वृत्तीचे होते🧠. त्यात सर्वप्रथम नाव येते ते चरकाचार्यांचे आणि सुश्रुताचार्यांचे. आत्ताच्या भाषेत सांगायचे तर एक Physician होते 🩺आणि एक Surgeon. सर्वच वनस्पतींवर त्यांचा अभ्यास होता. वनस्पतींचा कोणता भाग (मूळे,पाने, खोड, साल, फुले) औषधी आहे, त्यांचा गुणधर्म काय आहे, त्याचा वापर किती प्रमाणात असला पाहिजे याचे सखोल संशोधन त्यांनी केले होते.🌱🌿🍀🪵🎋🌴🍃 त्यांनी लिहिलेल्या ग्रंथात हे सर्व नमूद सुद्धा आहे.

आयुर्वेद शास्त्राचा गाभा हा रोग बरा करण्या बरोबरच तो रोग होऊ न देणे यावर जास्त आहे. रोजच्या जीवनात आपण कसे राहावे, काय आणि किती प्रमाणात खावे, विविध ऋतूंमध्ये आहारात काय बदल असावा, प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार यामध्ये कसा बदल आवश्यक आहे हे सर्व पाळणे म्हणजे आयुर्वेद शास्त्राप्रमाणे वागणे होय.🙂 (सध्याच्या जीवन शैलीत वरील जवळ जवळ कोणत्याच गोष्टी तितक्या काटेकोरपणे पाळल्या जात नसतील तरी माहिती म्हणून जरूर ध्यानात ठेवाव्यात)

आयुर्वेद शास्त्रानुसार मनुष्याच्या शरीरात वात, पित्त आणि कफ असे एकूण तीन मूळ दोष मानले आहेत. या त्रिदोषांपैकी एकाचे जरी संतुलन बिघडले तरी कोणता ना कोणता आजार डोकं वर काढतोच. 🤦🏻‍♀️ त्यामुळे वेळच्या वेळी घ्यायचा आहार आणि रोजच्या रोज केलेला व्यायाम 💪🏻 या दोनही गोष्टींना या शास्त्रात विशेष महत्व आहे. शिवाय रोग हा मुळापासून बरा करण्याची किमया पण हे शास्त्र करू शकते. (पण प्रत्येक शास्त्राप्रमाणे या शास्त्राला सुद्धा काही limitations आहेतच.)

आपला देश पारतंत्र्यात असणं हे सुद्धा आयुर्वेद शास्त्राला प्रसिद्धी न मिळण्याचं मोठं कारण म्हणता येईल. 🇬🇧 इंग्रजांच्या आगमनानंतर इंग्रजी औषधांवर बरेच संशोधन झाले पण आयुर्वेद शास्त्राला योग्य ती मान्यता किंवा राजाश्रय मिळाला नाही. त्यामुळे या शास्त्राची तितकी प्रगती झाली नाही.

पण सध्याचे दिवस हे तसे नाहीत. आता हे social media चे युग आहे. इंटरनेट, संगणक, मोबईल ही सगळीच खेळणी सगळ्यांच्याच हातात आहेत. 💻🖥️📱 आणि यांचाच वापर करून संपूर्ण जगात आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हे प्रत्येक भारतीय व्यक्तीचे कर्तव्यच आहे असे आम्ही मानतो 🇮🇳 तुमचे काय मत?? 😊

©️BM Herbals, Solapur

www.bmherbals.com

Blog Tags :
#bmherbals #bmherbalssolapur #ayurveda #ayurvedicmedicine #herbalproducts #परिपूर्णआरोग्य #comprehensivewellness #ancientindia #ancientayurveda

Product Category