चला, केस जिंकूया
केस - या शब्दाला प्रेत्येकाच्या आयुष्यात अनन्य साधारण असे महत्व आहे. मग ती कोर्टाची केस 👩🏻⚖️ असो किंवा डोक्यावरचे केस.💆🏻♀️
प्रत्येकाची धडपड ही केस जिंकण्यासाठीच असते. इथे केस जिंकणे म्हणजे डोक्यावर आहेत ते केस सांभाळणे, आणि गळत असतील तर त्याचे प्रमाण कमी करणे. बऱ्याच मित्र मैत्रिणींना 👫🏻 ही केस फारच सतावते आहे असे लक्षात आले आणि त्यांनी ती जिंकावी असे आम्हाला वाटले म्हणून हा लेखन प्रयोग.🖋️
केस गळणे, वाढ खुंटणे, चाई पडणे या सगळ्यांना अनेक कारणे आहेत. अनुवंशिकता 👩🏼🦲 हे सर्वात महत्वाचे कारण ज्याकडे आपण शक्यतो दुर्लक्ष करतो. यांच्या बरोबरीने नियमित तेल न लावणे, केमिकल युक्त हेअर प्रॉडक्ट वापरणे, आहारातील बदल, pregnancy ,🤰🏻 antibiotics 💊 चा वापर, hormonal imbalance , chemotherapy 💉 आणि दृष्टीस न पडणारा पण सतत आपल्या हातात हात घालून नेहेमी आपल्या बरोबर असणारा कुठला ना कुठला तरी stress . 😓
तसे पाहिले तर अनुवंशिकता सोडून इतर गोष्टीत आपण बदल करून आपल्या केसांचे आरोग्य नक्कीच सुधारू शकतो. जिथे आनुवंशिकतेचा प्रश्न आहे तिथे मात्र नियमित काळजी घेऊन आपण केसांचा प्रॉब्लेम पुढे नक्की ढकलू शकतो, म्हणजेच prolong करू शकतो. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाच्या वाढीला पाणी आणि खतांची गरज असते, त्याप्रमाणे केसांच्या वाढीला नारळाच्या तेलाची 🌴आणि त्यातील औषधी वनस्पतींची गरज असते. पुरुषांनी आठवड्यातून चार वेळा आणि स्त्रियांनी आठवड्यतून दोनदा तरी आपल्या केसांच्या मुळाशी तेल लावून massage करावा. 💆🏻♀️💆🏻♂️ असे केल्याने मुळांच्या ठिकाणी रक्ताभिसरण सुधारते आणि तेच केसांच्या वाढीला पोषक असते. रोजच्या आहारात ओला नारळ 🥥असेल तर केस वाढायला मदत होते. तसेच zinc , protein , Vit E हे सुद्धा आहारात असणे तितकेच आवश्यक आहे. तेल शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी लावावे म्हणजे सकाळ पर्यंत ६ ते ७ तास मुरायला मिळतात. सकाळी शक्यतो हर्बल शॅम्पू वापरून केस वरवरच धुवावे 🚿 जेणेकरून मुळाशी असलेले तेल तसेच राहील. अजून एक म्हणजे दर ४ ते ५ महिन्यांनी केस थोडेसे trim करावे💇🏻♀️. विशेषतः स्त्रियांनी. केसांच्या टोकाशी जे split ends तयार होतात त्यांनी देखील केसांची वाढ खुंटते.
नियमित तेल लावायला सुरु केल्या पासून साधारण २ ते ३ महिने result मिळायला लागतात. केस विंचरताना कंगव्यात जमा होणाऱ्या Dead Hair ची संख्या हळूहळू कमी होते, नवीन केसांची वाढ सुरु होते आणि आपल्याला ही केस जिंकल्याचा प्रचंड आनंद मिळतो. 😃💃🏻 आणि तो आपल्या चेहेऱ्यावर अगदी उठून दिसतो.
मग मंडळी? केसांची ही केस जिंकणार ना? नक्की कळवा.
टीप: chemotherapy चालू असतानाच्या काळात केसांचे फारच जास्त नुकसान होते. कोणतेही केसांच्या वाढीचे तेल हे chemotherapy treatment पूर्ण झाल्यावर लावण्यास सुरुवात करावी.